भारतातील किती उद्योगपती टाटांसारखे दानशूर आहेत ?

रतन टाटा

‘टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन्. चंद्रशेखरन् यांच्या पुढाकाराने टाटा समूहाने कोरोनाच्या संकटात साहाय्य करण्यासाठी ‘नो लिमिट’ (अमर्यादित) साहाय्याची योजना आखली आहे. टाटा समूह या योजनेसाठी २ सहस्र कोटी रुपये व्यय करणार आहे. जानेवारी ते मार्च २०२१ या ३ मासांत टाटा समूहाला जो नफा झाला, त्याच रकमेतून ते ही रक्कम व्यय करणार आहेत.’