हिंदूंचे वेद, शास्त्र आणि पुराणे यांनुसारच मंदिराचे प्रशासन चालले पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

मंदिर प्रशासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा हिंदूंना अधिकार आहे. न्यायालयातही योग्य न्याय मिळाला नाही, तर हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा करण्याची मागणी करू शकतात.

हिंदूंनी एकत्र लढल्यास निश्‍चितच आपला विजय होणार ! – रमेश सोलंकी

‘नेटफ्लिक्स’च्या विरोधात मी याआधी तक्रार केली होती. त्यानंतर हिंदु जनजागृती समिती माझ्या समवेत उभी राहिली. मी तक्रार मागे घेतली नाही. दुसर्‍याच दिवशी ट्विटरवर ‘नेटफ्लिक्स’वर बंदी आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री

हिंदु धर्माच्या विरोधात निश्‍चितच मोठे षड्यंत्र कार्यरत आहे. हिंदु सनातन धर्म अतिशय पुरातन असून त्याला मानणारे लोक बहुसंख्य आहेत. हे काही धर्मविरोधकांना रूचत नसल्याने हिंदु धर्म संपुष्टात आणण्यासाठी चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमांतून हिंदूंच्या मनावर आघात…….

 महिलांनो, सक्षम होण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या ! – कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

‘सध्या प्रतिदिन १४ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. धर्माचरण,  धर्माभिमान यांचा अभाव आणि पाश्‍चिमात्त्यांचा प्रभाव महिला आणि मुली यांवर झाला आहे. हिंदु स्त्रियांना घट्ट, तोकडे कपडे घालणे, केस मोकळे सोडणे म्हणजे ‘आम्ही आधुनिक आहोत’, असे वाटते.

सहस्रो वर्षांपूर्वी वास्तूशास्त्राचा इतका सखोल अभ्यास करणारा महान हिंदु धर्म !

वास्तूशास्त्रानुसार सूर्यादी ग्रह, नक्षत्रे, पृथ्वी, तसेच अनेक ऊर्जास्रोतांचा वास्तूवर आणि वास्तू उपभोगल्यावर होणार्‍या इष्ट आणि अनिष्ट परिणाम यांचा संपूर्ण विचार करूनच इमारत बांधणे श्रेयस्कर आणि अंतिमतः समाजहिताचे असते.’

मंदिरांतील धन लुटणे आणि हिंदूंच्या श्रद्धांचे भंजन करणे, हे धर्मांधांचे षड्यंत्र ! – गंगाधर कुलकर्णी, कार्याध्यक्ष, श्रीराम सेना

मंगळुरू येथील कोरगज्जा देवस्थानाच्या दानपेटीत ३ धर्मांध युवकांनी गर्भनिरोधक टाकले. या कृत्यानंतर त्या तिघांमधील नवाज याने रक्त येईपर्यंत स्वत:चे डोके भिंतीवर आपटून घेतले. यात त्याचा मृत्यू झाला.

मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी यांमुळे मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमणे होत आहे.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी.

‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू !

बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’

धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची दु:स्थिती !

‘हिंदू सोडले, तर प्रत्येक धर्मियांना त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. इतर धर्मीय नित्यनेमाने त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातात. हिंदूंना त्यांच्या धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे ते मंदिरांमध्येही कधी कधी जातात. मंदिरात आरतीच्या वेळी घंटाही यंत्राच्या साहाय्याने वाजवावी लागते, अशी स्थिती आहे.’