
लॉस एंजिल्स (अमेरिका) – येथील वेस्टलेक व्हिलेज या भागात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात येत होते. या वेळी एका ६५ वर्षीय वृद्ध ज्यू नागरिकाने त्यांना विरोध केल्याने त्याच्यावर आक्रमण करण्यात आले. यात या वृद्धाचा मृत्यू झाला. पॉल केसलर असे या मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबरला घडली. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
या संदर्भात येथील ज्यू संघटना ‘ज्यू फेडरेशन ऑफ ग्रेटर लॉस एंजिल्स’ने म्हटले की, अशा प्रकारचा ज्यूंच्या विरोधातील हा चौथा गुन्हा आहे. आम्ही या संदर्भात अधिक माहितीची वाट पहात आहोत. सभ्य समाजात हिंसेला कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही आमच्या संरक्षणाची मागणी करत आहोत. आम्ही आमच्या विरोधातील हिंसा सहन करू शकत नाही. ही हिंसा रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू.
इस्रायलमध्ये हमासच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणानंतर इस्रायल याला प्रत्युत्तर देत आहे. तेव्हापासून जगभरात इस्रायलला विरोध होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या लीऑन शहरात एका ज्यू महिलेला तिच्या घरात घुसून चाकूने भोसकण्यात आले होते.
संपादकीय भूमिकायाविषयी जगभरातील पॅलेस्टाईन समर्थक बोलतील का ? भारतातील सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा आदींना ही हत्या मान्य आहे का ? |
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार