
पणजी : पंजाबमधील ४ हत्या प्रकरणांमध्ये पोलीस शोध घेत असलेल्या २ आरोपींना गोव्यात झुवारीनगर, सांकवाळ येथून अटक करण्यात आली. अमृतसर पोलिसांच्या विशेष पथकाने गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या साहाय्याने अमृतसर येथील २२ वर्षीय सामलवल गुरुनान सिंह आणि २२ वर्षीय अमृत केवल सिंह यांना अटक केली. हे दोघे झुुवारीनगर येथे भाड्याच्या खोलीत लपून राहिले होते. (गोव्यात भाडेकरूची पडताळणी होत नसल्याने आणि मालक भाडेकरूंची माहिती पोलिसांना देत नसल्यानेच गुन्हेगारांचे फावते ! – संपादक) सामलवल सिंह याने ४ जणांची हत्या करून तो पंजाबमधून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या), १२० ब (गुन्हेगारी कट) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम २५ आणि २७ अंतर्गत गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते.
संपादकीय भूमिकागुन्हेगारांना गोवा लपण्यासाठी सुरक्षित स्थळ वाटते. चार्ल्स शोभराजपासून आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना गोव्यात अटक करण्यात आली आहे. गोव्याची ही प्रतिमा पालटायला हवी ! |
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin
गायीला राष्ट्रमाता घोषित करा ! – पू. किशोरशास्त्री दवे