नवी देहली – येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीमध्ये दिलबर नेगी या हिंदु तरुणाची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ११ मुसलमानांना देहलीच्या कडकडडूमा न्यायालयाने निर्दोष ठरवत मुक्तता केली, तर महंमद शाहनवाज याला सोडण्यास नकार दिला आहे. महंमद फैजल, आजाद, असरफ अली, राशिद (मोनू), शाहरुख, महंमद शोएब (छुटवा), परवेज, राशिद (राजा), महंमद ताहिर, सलमान आणि सोनू सैफी अशी या मुसलमानांची नावे आहेत. नेगी येथील मिठाईच्या दुकानात काम करत होता. या दुकानात त्याचे हात-पाय तोडून नंतर त्याला जिवंत जाळण्यात आले होते.
महंमद शाहनवाज याच्यावर हत्या, दंगल, जमावाला गोळा करणे आदी आरोप आहेत.
न्यायाधीश पुलस्त्य प्रमाचल निर्णय देतांना म्हणाले की, आरोपींची ओळख दंगलीतील अनेक व्हिडिओंमध्ये झाली आहे; मात्र हे सर्व जण शाहनवाज याच्यासमवेत मिठाईच्या दुकानाच्या गोदामाला आग लावत असतांना दिसलेले नाहीत. शाहनवाज याच्या विरोधात तो जमावासमवेत हिंदूंची घरे, दुकाने आदी नष्ट करून त्यांना आग लावत असल्याचे पुरावे सापडले आहेत.
संपादकीय भूमिकाजर हे आरोपी निर्दोष आहेत, तर हिंदु तरुणाची हत्या कुठल्या धर्मांधांनी केली ? हे आता कोण शोधणार ? |