पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.

मृत्यूच्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांना ४५ ‘मिस्ड कॉल’ ! – चित्रा वाघ, भाजप

हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

केरळमध्ये संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष एस्.डी.पी.आय. यांच्यातील हाणामारीत १ स्वयंसेवक ठार !

धर्मांध राजकीय पक्ष असणार्‍या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेच्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा आणि सत्र न्यायालयात, पारनेर न्यायालयाने काढलेल्या ‘स्टँडिंग वॉरंट’ विरुद्ध पुनर्निरीक्षण अर्ज प्रविष्ट केला होता. त्यामध्ये वॉरंट रहित करण्याविषयी त्याने विनंती केली होती.

इराणमध्ये हत्येच्या आरोप असणार्‍या महिलेचा मृत्यू झाल्यानंतरही तिच्या मृतदेहाला दिली फाशी !

इस्लामी देश असलेल्या इराणची क्रूर मानसिकता लक्षात येते !

हिंदु नाव धारण करून सुरक्षारक्षकाची नोकरी करणार्‍या धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या !

अशा विकृत वासनांध धर्मांधाना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; मात्र बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममता(बानो) यांचे सरकार असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे !

पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?

पिसादेवी (जिल्हा संभाजीनगर) येथे पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

फ्रान्स सरकारने संसदेत संमत केले धर्मांधांवर नियंत्रण ठेवणारे विधेयक !

आतापर्यंत भारत ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी निष्क्रीयच राहिला आहे ! फ्रान्स धर्मनिरपेक्षतेचे पालन होण्यासाठी कायदा करत आहे, हे भारताने आणि भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी लक्षात घ्यावे !

गोध्रा दंगलीतील मुख्य आरोपी रफीक हुसेन याला १९ वर्षांनंतर अटक

अशांना आता पोसत रहाण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी गुजरात सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !