केरळमध्ये भाजप नेते रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.च्या) ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. १९ डिसेंबर या दिवशी राज्यातील अलप्पुझा जिल्ह्यामध्ये श्रीनिवासन् यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येच्या काही घंटे आधी एस्.डी.पी.आय.चे राज्य सचिव के.एस्. शान यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी श्रीनिवासन् यांची हत्या करण्यात आली होती. शान यांच्या हत्येच्या प्रकरणी रा.स्व. संघाच्या २ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.