देहली येथे हिंदु तरुणाची हत्या करणार्‍या रमझान अली याला अटक !

रमझान याचे सहकारी पसार

‘मॉब लिंन्चिंग’च्या (जमावाकडून केलेल्या हत्येच्या) नावाने हिंदूंवर आरोप करणारे धर्मनिरपेक्षतावादी, पुरोगामी आणि बुद्धीवादी हिंदु युवकाच्या हत्येचा निषेधही करणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

(प्रतिकात्मक छायाचित्र)

देहली – येथील संगम विहार परिसरात २ हिंदु युवकांवर ७-८ लोकांनी प्राणघातक आक्रमण केले. यात २४ वर्षीय जतिन याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र पंकज हा गंभीर घायाळ झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही छायाचित्रण समोर आल्यानंतर पोलिसांनी रमझान अली याला अटक केली आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रमझान आणि त्याचे सहकारी यांनी जतिन आणि पंकज यांच्यावर दगड फेकून आक्रमण केले, तसेच त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आले. या दोघांकडे असलेले ३ सहस्र रुपयेही रमझान आणि त्याचे सहकारी यांनी लूटले. त्यानंतर दोघांनाही नाल्यामध्ये फेकून आरोपी पसार झाले. याविषयी तेथून जाणार्‍या लोकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात भरती केले. उपचार चालू असतांना २२ डिसेंबर या दिवशी जतिनचा मृत्यू झाला. जतिन आणि पंकज हे दोघेही मध्यरात्री अनुमाने २ वाजता मित्र सचिन याच्या भावाच्या वाढदिवसाची मेजवानी करून घरी परत जात होते. तेव्हा रमझान आणि त्याचे सहकारी यांनी त्यांच्यावर आक्रमण केले. ‘या प्रकरणी पसार झालेल्या आरोपींचा शोध चालू असून त्यांना लवकरच पकडण्यात येईल’, अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्षवर्धन यांनी दिली.