पाकच्या सिंधमध्ये हिंदु व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

पाकमध्ये असुरक्षित हिंदू !

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील अनाज मंडी भागामध्ये ४४ वर्षीय हिंदु व्यावसायिक सुनील कुमार यांची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी स्थानिक हिंदूंनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. या घटनेमुळे येथे बंद पाळण्यात आला.