मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीचा दुष्परिणाम ! उच्चशिक्षणाच्या समवेत धर्मशिक्षण असेल, तरच जीवनात येणार्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. यासाठी पालकांनी मुलांना धर्मशिक्षण देऊन साधना करवून घेणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – कोरोनामुळे निर्माण झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात नोकरी गेली. आईचे वय झाल्याने ती सतत आजारी असायची. कर्जबाजारीपणामुळे तिच्या महागड्या गोळ्या, तसेच औषधोपचार करणे शक्य नव्हते. यामुळे आलेल्या नैराश्येतून धनकवडी येथे रहाणारे ४२ वर्षीय अभियंता गणेश फरताडे यांनी स्वत:च्या ७६ वर्षीय आईला गोळ्यांचा ‘ओव्हर डोस’ (अधिक प्रमाणात गोळ्या घेणे) देऊन ती निपचित पडल्यावर आईचा दोरीने गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली.