|
|

गौहत्ती (आसाम) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी वर्ष २०२१ हे वर्ष भीतीचे, हत्यांचे, रक्ताचे आणि अश्रूंचे होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार जगाने पाहिले. धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरांवर आणि दुर्गादेवीच्या मंडपांवर आक्रमणे केली. ‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार धर्मांधांनी वर्ष २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. वर्ष २०२० मध्ये १४९, तर वर्ष २०२१ मध्ये १५२ जण मारले गेले. धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर १ सहस्र ८९८ वेळा आक्रमणे केली. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे.
१. वर्ष २०२० आणि २०२१ मध्ये एकूण २५५ हिंदूंचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी वर्ष २०२१ चा आकडा हा १५१ आहे. अपहरण झालेल्या लोकांपैकी ८० टक्के लोक मुली किंवा महिला होत्या.
२. धर्मांधांनी वर्ष २०२१ मध्ये २ सहस्र १३० हिंदु देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. ही संख्या वर्ष २०२० च्या तुलनेत ५०० टक्के (५ पटींनी) अधिक आहे.
३. वर्ष २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली, जी वर्ष २०२० च्या तुलनेत ७०० टक्क्यांनी वाढली आहेत.
४. धर्मांधांनी वर्ष २०२१ मध्ये ३ सहस्र २५६ हिंदु कुटुंबांना लुटलेे, जे वर्ष २०२० च्या तुलनेत ५०० टक्क्यांनी वाढले आहे.
५. वर्ष २०२१ मध्ये १ लाख २३ सहस्रांहून अधिक कुटुंबांनी नोंदवले आहे की, देशातील धर्मांधांच्या टोळ्यांच्या धमक्यांमुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत २० पटींहून अधिक आहे.
६. केवळ या एकाच वर्षात धर्मांधांच्या आक्रमणात तब्बल १ लाख ३५ सहस्रांहून अधिक घरे, मंदिरे आणि व्यवसाय यांची हानी झाली आहे.
७. वर्ष २०२१ मध्ये बांगलादेशात ४६ हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि ४११ हून अधिक हिंदु महिलांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर शारीरिक आक्रमणे करण्यात आली.
८. धर्मांधांकडून ३२ हिंदूंना गोमांस खाण्यास भाग पाडले गेले.
९. वर्ष २०२१ मध्ये किमान ९ सहस्र हिंदु कुटुंबांना धर्मांधांनी बांगलादेश सोडण्यास भाग पाडले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५ पट अधिक आहे.
१०. एकंदरीत धर्मांध टोळ्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे यावर्षी हिंदु समाजाचे जवळपास १ सहस्र १४६ कोटी रुपयांची हानी झाली आहे.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Amroha Conversion : अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे नाव पालटून रुग्णालय चालवणार्या मुसलमानाकडून हिंदु परिचारिकेचे धर्मांतर
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !