कराड येथे युवतीची डोक्यात दगड घालून हत्या !

कार्वे-कोरेगाव रस्त्यावर घटनास्थळी पंचनामा करतांना पोलिस

कराड, ४ जानेवारी (वार्ता.) – उसाच्या शेतात एका २५ वर्षीय युवतीची डोक्यात दगड घालून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. ३ जानेवारी या दिवशी सकाळी स्थानिकांना कार्वे-कोरेगाव रस्त्यावर उसाच्या शेतात २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती पोलिसांना दिली. या वेळी मृतदेहाजवळ मोठा दगड पडल्याचे निदर्शनास आले. मृतदेहाच्या डोक्यावर आणि चेहर्‍यावर दगडाने ठेचल्याच्या खूणा होत्या. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.