जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येच्या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकार्‍याला २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

या घटनेमुळे संपूर्ण जपान हादरले आहे. आबे हे आतापर्यंत सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले जपानचे पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी वर्ष २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचे त्यागपत्र दिले होते. जगभरातील विविध मान्यवरांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली.

म्हैसाळमधील हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’ ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील वनमोरे कुटुंबातील ९ जणांची हत्या करण्यात आली. वनमोरे कुटुंबाचे गुप्तधनाच्या आमिषातून केलेले हे हत्याकांड म्हणजे ‘मांत्रिक जिहाद’च आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांचे २ साथीदार यांची हत्या !

तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याने त्या पक्षाचे नेतेही असुरक्षित आहेत !

म्यानमारमध्ये दोन तमिळ तरुणांची गोळ्या झाडून हत्या

मणीपूर राज्यातील मोरेह शहरातून म्यानमार देशातील तामू शहरामध्ये गेलेल्या पी. मोह आणि एम्. अय्यरनार या दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्यात अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या.

मुख्य आरोपी इरफान शेख याला बलात्काराच्या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झाली होती !

येथील उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी इरफान शेख आणि त्याचे ३ साथीदार यांनी एका हिंदु महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने इरफान याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

नाशिक येथे मुसलमान धर्मगुरूंची गोळ्या झाडून हत्या

येथील चिचोंडी औद्योगिक परिसरात ५ जुलै या दिवशी मुसलमानांचे धर्मगुरु सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (वय ३५ वर्षे) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर घटनास्थळावरून ४ अज्ञात संशयितांनी चारचाकीतून पलायन केले.

गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या

दिवसाढवळ्या अशा प्रकारची हत्या होण्याची घटना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍न निर्माण करणारी आहे !

हर्ष हत्याकांडातील आरोपीला कारावासात विशेष सुविधा !

आरोपी कारागृहात भ्रमणभाषवर बोलत असल्याचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता कारागृह प्रशासन ‘आरोपीकडे कारागृहात भ्रमणभाष कसा आला ?’ याचा शोध घेत आहे !