
पुणे, २३ जून – भारतीय हवामान विभागाने यंदा अल्प पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा गैरवापर (अपव्यय) रोखण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणे, इमारतीवरील पिण्याच्या पाण्याची टाकी भरून पाणी वहाणे, तसेच महापालिकेच्या किंवा खासगी टँकरमधून पाणी गळती झाली, तर १० सहस्र रुपये दंड आकारला जाणार आहे. ‘वारंवार नियमभंग केल्यास गुन्हा नोंद केला जाणार’, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पुनीत कौर यांनी दिली. सार्वजनिक आणि खासगी गाडी धुण्याची (‘वॉशिंग सेंटर’) ठिकाणे, सार्वजनिक आणि खासगी पोहण्याची ठिकाणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्याने, पदपथ आणि अंगण स्वच्छतेसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. खासगी गृहनिर्माण संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस्.टी.पी.) कार्यान्वित करून त्या पाण्याचा पुनर्वापर बागकाम आणि शौचालय यांसाठी करणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहू नयेत; म्हणून ‘ऑटोमॅटिक फ्लोट व्हॉल्व’ बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !
हिंदु जनजागृती समितीकडून मंत्री नितेश राणे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !
आषाढी वारीमध्ये वारकर्यांना असुविधा न होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ! – मंत्री जयकुमार गोरे