भावी पत्नीसह ८ जणांवर गुन्हा नोंद

पुणे – काही दिवसांपूर्वी लोहगडावर पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा केतन अग्रवाल याचा पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना घडली होती; मात्र पोलिसांच्या अन्वेषणात हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचे उघड झाले आहे. केतनचे लग्न सिया गोयल हिच्याशी ठरले होते; परंतु तिला हे लग्न मान्य नव्हते. पोलिसांनी ‘मोबाईल कॉल रेकॉर्ड’ आणि ‘टॉवर लोकेशन’ पडताळले असता १८ जूनला सिया गोयल हिने तिचा मित्र चेतन चौधरी आणि इतर सहकारी यांच्या साहाय्याने केतनला लोहगडावरून ढकलून दिल्याचे समोर आले. अनुमाने आठवडाभरापासून या हत्येचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित सिया गोयल आणि तिच्या ८ मित्रांवर गुन्हा नोंद केला आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
राज्यातील १०३ विधी महाविद्यालयांना ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता नाही !
दौंड (पुणे) येथे नकली मद्य सिद्ध करणार्या चौघांना अटक !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !