भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांचे संयुक्त आयोजन

भिलवाडा (राजस्थान) – सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त भावी पिढी घडवण्यासाठी ‘भारत विकास परिषद (विवेकानंद शाखा), श्री काशीपुरी वकील कॉलनी महेश समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने संयुक्तपणे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा ५५ मुलांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेविका समिती’च्या विभागीय पालक संचालिका सुशीला जाट, संस्कार उपक्रमांचे प्रांतीय संयोजक श्री. अरुण बाहेती, विवेकानंद केंद्राच्या प्रांत संचालिका शकुंतला डाड, गायत्री परिवाराच्या सरोजना व्यास, डॉ. उत्कृष्ट मांडोत, हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया आणि वीररस कवी श्री. योगेंद्र शर्मा यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
या वेळी श्री. आनंद जाखोटिया म्हणाले, ‘‘या स्पर्धात्मक युगात बौद्धिक विकासासह आध्यात्मिक विकासही आवश्यक आहे. गुरुकुलपद्धत पूर्वीइतकी आता प्रचलित नसली, तरी मुलांमध्ये अध्यात्म रुजवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’ या शिबिरात कल्पना काबरा, कु. अदिती काबरा, सनातन संस्थेच्या सौ. राखी मोदी, श्री. दीपक लढ्ढा आणि श्री. विष्णुकांत शर्मा यांनी मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये मुलांना सनातन संस्थेने केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी माहिती सांगण्यात आली. त्यात मंदिराच्या गर्भगृहाची रचना, त्याची सकारात्मक ऊर्जा आणि देवतांना नमस्कार करण्याची शास्त्रीय पद्धत सांगण्यात आली. समारोप सत्रात मुलांनी सूर्यनमस्कार का करावा ?, गणेशवंदना, मंदिर दर्शनाचे शास्त्र, वाढदिवस साजरा करण्याची भारतीय पद्धत, वास्तूशुद्धी, कपाळावर टिळा लावण्याचे शास्त्र इत्यादी विषयांवर शास्त्रीय माहिती देण्यात आली. यासमवेतच या शिबिरात मुलांना नेहमी सत्य बोलणे, चांगले आचरण करणे, ‘फास्ट फूड’ (पिझ्झा, बर्गर) टाळणे, सात्त्विक आहाराचा अवलंब करणे यांसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
समारोप समारंभप्रसंगी श्री. गोविंद प्रसाद सोदानी यांनी शंखनाद केला. शिबिर संयोजक श्री. बालकिशन पारीख यांनी समारोपाची रूपरेषा सादर केली. सचिव श्री. के. जी. सोनी यांनी शिबिरात ६ दिवस घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. शेवटी शाखा अध्यक्ष श्री. गिरीश अग्रवाल यांनी आभार व्यक्त केले.

क्षणचित्रे
१. शिबिर स्थळी सनातन संस्थेचे विविध ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स फलक आणि विविध राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
२. गोवर्धन पर्वत उचलेल्या भगवान श्रीकृष्णाचा ‘सेल्फी पॉईंट’ (स्वतःचे छायाचित्र काढणे) मुलांसाठी आकर्षण ठरला.
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन
‘तिहेरी तलाक’ आणि ‘बहुपत्नीत्व’ यांवरून विधानसभेत गदारोळ
उत्तरप्रदेश : भगवान हनुमानाच्या मूर्ती तोडफोडीच्या प्रकरणी असद याच्यावर आरोप