
कोल्हापूर – गेल्या १२ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे महापालिकेने तोडून २ सहस्र ९०० चौरस मीटर जागा खुली केली आहे. ही सर्व बांधकामे पूरपट्ट्यातील आहेत. ही बांधकामे वाचवण्यासाठी व्यापार्यांनी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली; मात्र न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिला.
जे.सी.बी., तसेच अन्य वाहनांचा उपयोग करत महापालिकेच्या ३ ‘अतिक्रमण निर्मूलन पथका’ने सिमेंटची बांधकामे, पत्र्याची शेड अशी २३ बांधकामे पाडून टाकली. शहरात इतर ठिकाणीही विनाअनुमती जी बांधकामे आहेत, ती सर्व काढण्यात येतील, असे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी सांगितले.
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !