कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई – राज्यातील कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, महिला शेतकरी, संस्था आणि कृषी अधिकारी-कर्मचारी यांच्या गौरवासाठी महाराष्ट्र शासनाने २०२३ अन् २०२४ चे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार घोषित केले आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजर्या होणार्या कृषीदिनाचे औचित्य साधून १ जुलैला मुंबईत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित रहातील. कृषीक्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, फलोत्पादन आणि उत्पादनवाढीत उल्लेखनीय योगदान देणार्या एकूण १८९ पुरस्कारार्थींचा या वेळी सत्कार केला जाईल.
प्रदान करण्यात येणारे प्रमुख पुरस्कार !
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार
- वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार
- जिजामाता कृषीभूषण पुरस्कार
- कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार
- वसंतराव नाईक शेतीमित्र
- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !