रांची (झारखंड) येथील ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ या देशभक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला सत्कार

रांची (झारखंड) – येथील ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी समर्पित असलेल्या ‘हिंदु जनजागृती समिती’चे पूर्व अन् ईशान्य भारत राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे, तसेच अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात देशभक्ती, सांस्कृतिक मूल्यांचे जतन आणि समाजात राष्ट्रकेंद्रित विचारसरणी बळकट करण्याची आवश्यकता यांवर विशेष भर देण्यात आला. या वेळी श्री. शंभू गवारे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या अभियानासह लव्ह जिहादविषयी उपस्थितांचे प्रबोधन केले.
या कार्यक्रमात ‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्थे’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रेमी वर्मा यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी समितीच्या रांची येथील समन्वयक पूजा चौहान याही उपस्थित होत्या.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
‘हर घर योद्धा’ या उपक्रमांतर्गत फरीदाबाद (हरियाणा) येथे शौर्यजागृती प्रशिक्षण शिबिर
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी