
ठाणे – ठाणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत सकाळपासून पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. डोंबिवली परिसरात सकाळपासून रिमझिम पडणार्या पावसातही शिवाजी शेलार चौक परिसरात महावितरणचा विजेचा एक खांब अचानक कोसळला. या अपघातात २ दुचाकींची हानी झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित यंत्रणांनी तुटलेला खांब हटवून वीजपुरवठा पूर्ववत् केला. पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटल्या. पावसाने समाधानकारक उपस्थिती लावल्याने ग्रामीण भागातील पेरणीच्या कामांना वेग आला असून शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे.
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू
क्षुल्लक कारणावरून धर्मांध रिक्शाचालकाचे हिंदु बसचालकावर आक्रमण !
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर