तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !

उखडलेल्या आणि तुटलेल्या लाद्या

वाशी – तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था झाली आहे. महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षाविषयी प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

१. अनेक ठिकाणी पदपथावरील लाद्या उखडलेल्या आहेत. काही ठिकाणी लाद्यांना धार असल्याने प्रवाशांना गंभीर ठेच लागून ते घायाळ होत आहेत.

२. रेल्वे स्थानकाच्या येथून तुर्भेकडे जातांना याच पदपथांवर काही ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी नियंत्रण मिळवले आहे. काही ठिकाणी वाहने अनधिकृतरित्या लावली जातात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.

३. या वाहनांच्या आडून काही लोक येथे पदपथावर लघुशंका करतात. त्यामुळे ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्य आणि घरातील अडगळीचे साहित्य ठेवण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासन झोपा काढत आहे का ?