खासगी रुग्णालयांनी अनुमतीविना कोरोनाच्या रुग्णाला भरती करून नये – मनपा

५ जानेवारीला एकाच दिवसात कोरोनाचे १५ सहस्र रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे !

मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !

मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे.

मुंबईतील रेल्वेस्थानकांवर बाँबस्फोटाची धमकी

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला या रेल्वेस्थानकांवर बाँबस्फोट करण्याची धमकी निनावी फोनद्वारे मिळाल्याने ७ जानेवारी या दिवशी येथे एकच खळबळ उडाली होती

लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र देणार्‍याला अटक

नाडर याचे सायबर कॅफेचे दुकान असून तो १ सहस्र रुपयांमध्ये हे प्रमाणपत्र देत होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्याकडे पाठवलेला ग्राहक मुंबईत असतांनाही त्याला बिहारमध्ये लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र त्याने दिले.

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक !

या आक्षेपार्ह पोस्टविषयी शिवसैनिकांनी तक्रार केली होती. त्याआधारे ६ जानेवारीला रात्री गुन्हा नोंद करून रात्री उशिरा संदीप म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईत ३ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या पाण्याची चोरी ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

मुंबईतील विहिरींमधून पाण्याचा उपसा अनधिकृतपणे होत आहे. ज्यांनी अनधिकृतपणे पाण्याची लूट केली आहे, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात यावी, असे पत्रात शेलार यांनी म्हटले आहे.

५५ वर्षांवरील पोलिसांना घरून काम करण्याचे आदेश !

पोलिसांनाही अधिक प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना घरून काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

जोगश्वरी (मुंबई) येथील शिकवणीवर्गांत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

जोगश्वरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दोन शिकवणीवर्गांत झालेल्या व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करण्याचा निर्धार केला आणि ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करणे टाळले.

मराठी पत्रकारितेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य ! – मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला.