राज्यातील सर्व विद्यापिठे आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वृद्धी होत असल्याने राज्यातील सर्व विद्यापिठे, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको ! – राष्ट्रवादी काँग्रेस

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी न्यायालयीन लढा लढण्याचे उत्तरदायित्व छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमेट्रिक’ यंत्रणा तात्पुरती बंद करण्याचा शासनाचा आदेश !

शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांमध्ये ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जलदगतीने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांतील ‘बायोमट्रिक’ यंत्रणा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हिंदूंच्या धर्मसंसदेत सैन्य, पोलीस आणि नागरिक यांना अल्पसंख्यांकांची हत्या करण्यास सांगितले जात असल्याचा हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांचा कांगावा !

प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंची दिशाभूल करण्यासाठी खोटे ट्वीट करणारे जावेद अख्तर ! हिंदूंच्या धर्मसंसदेविषयी दिशाभूल आणि धर्मांधांच्या अत्याचाराविषयी सोयीस्कर मौन !

आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ७ जानेवारीला सुनावणी होणार !

‘प्रतिज्ञापत्र सादर होत नाही, तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करण्यात येणार नाही’, असे तोंडी आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिले आहे.

…तर दळणवळण बंदी लागू करावी लागेल ! – किशोरी पेडणेकर, महापौर

कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० सहस्रांच्या पुढे गेली, तर मुंबईमध्ये दळणवळण बंदीचा विचार करावा लागेल, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने ! – सौ. भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनावरील उपाययोजनांचे काम संथ गतीने चालू आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार यांनी आरोग्य सचिव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले…

मुसलमान महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करणार्‍या दोघांना अटक

या प्रकरणात टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.

समीर वानखेडे यांचे स्थानांतर !

समीर वानखेडे यांचा अमली पदार्थविरोधी विभागातील कार्यकाळ संपला आहे. ३१ डिसेंबरनंतर त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने ते त्यांच्या भारतीय महसूल सेवेत परत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी ८० टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित ! – आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल

चहल पुढे म्हणाले की, असे असले, तरी सध्या ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे मुंबईकरांना घाबरण्याची आवश्यकता नाही. मुंबई महापालिकेने विदेशातून येणार्‍या प्रवाशांचे विलगीकरण करण्यासाठी विषेश मोहीम राबवली आहे.