मुंबई – पोलिसांनाही अधिक प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना घरून काम करण्याचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. मुंबईत गेल्या २४ घंट्यांत ७१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत ९ सहस्र ५१० पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.