सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा !

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

मालवणी (मुंबई) येथील क्रीडासंकुलाला दिलेल्या टिपू सुलतान याच्या नावाला विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांकडून अटक !

वैध मार्गाने आंदोलन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना अटक करून मर्दुमकी दाखवणारे पोलीस हे हिंसक धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !

महाराष्ट्रातील सुपर मार्केटमध्ये आता ‘वाईन’ मिळणार : राज्य सरकारचा निर्णय !

मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !

‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला काँग्रेसचा विरोध, चित्रपटावर बंदी घालण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

इतर वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गुणगान करणारे काँग्रेसवाले या चित्रपटावर मात्र बंदी घालण्याची भाषा करतात ? ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?

क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन ! हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ?

‘इन्फ्राटेक’ने आणली लँड ट्रेडिंग योजना !

भूमीत गुंतवणूक का करावी ?
कमी गुंतवणूक जास्त परतावा, स्थिर मालमत्ता, सोपी प्रक्रिया, स्पर्धा नाही, कमी मालमत्ता कर, कुणीही व्यापार करू शकतो, संपूर्ण सुरक्षा, मोठा ग्राहकवर्ग

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी भूमीपुत्रांचे आंदोलन !

आंदोलनाच्या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांच्या भीतीने सिडकोने २३ जानेवारीपासूनच विमानतळाचे काम बंद ठेवले होते.

कर्जबाजारी झालेल्या महावितरणवर सार्वजनिक योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ !

एरव्ही एखाद्या ग्राहकाकडून वीजदेयकाचे पैसे न भरल्यास तात्काळ त्याला देण्यात आलेला वीजपुरवठा खंडित केला जातो. असे असतांना महावितरणने ग्रामविकास आणि नगरविकास विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही ?

पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम

अचानक वातावरणात झालेल्या पालटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात यांच्या दिशेने सरकत आहे.

तरुणीवर बलात्कार करणार्‍या २ अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक

संस्कारांच्या अभावामुळे कामांध पिढी निपजणे हे मेकॉले शिक्षणपद्धतीचे अपयश होय !