मुंबई – पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम झाला आहे. हवेमध्ये पुष्कळ प्रमाणात धुळीचे कण पसरल्याने २३ जानेवारीला मुंबई आणि शेजारील शहरांमधील दृश्यमानता (समोरील दिसण्याचा भाग) अतिशय अल्प झाली होती. त्यात पहाटे पाऊस पडल्याने अनेक गाड्या आणि वस्तू यांवर पांढरे डाग पडले.
A thick layer of haze settled over #Mumbai today, just a day after a western disturbance and cyclonic circulation over Rajasthan brought unseasonal rains to the city
(@pryagaroradesai reports)https://t.co/HxWAL76zuQ
— Hindustan Times (@htTweets) January 23, 2022
अचानक वातावरणात झालेल्या पालटामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. धुळीचे वादळ पाकिस्तानमधील कराचीमध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात यांच्या दिशेने सरकत आहे. यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी खालवली आहे.