वैध मार्गाने आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना अटक करून मर्दुमकी दाखवणारे पोलीस हे हिंसक धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक
मुंबई, २७ जानेवारी (वार्ता.) – मालवणी येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्यात आले आहे. याचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी या दिवशी मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांच्या हस्ते होणार होता. येथे टिपू सुलतान याच्या नावाला विरोध करणार्या शेकडो हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी चारकोप पोलीस ठाणे येथे नेले. आंदोलनकर्त्यांमध्ये विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी टिपू सुलतान याचे नाव देण्याविषयी कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली; मात्र कागदपत्रे न दाखवता पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच अटक केली. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक)