समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

मुंबई – महाराष्ट्रात सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकाने यांमध्ये वाईन विक्री करता येईल, असा निर्णय घेतला आहे. या समाजविघातक निर्णयाचा सनातन संस्था जाहीर निषेध करते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज आदी शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि सहस्रो मावळ्यांच्या पराक्रमाने पुनीत झालेली भूमी ‘मद्यपींची भूमी’ म्हणून म्हटली गेल्यास त्याचे पातक सरकारला लागेल. हा निर्णय सुसंस्कृत महाराष्ट्राला काळिमा फासणारा असून त्यामुळे तो त्वरित रहित करण्यात यावा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे.
शेकडो संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीचा करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारा आहे.
मा. @CMOMaharashtra, हा समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! pic.twitter.com/v0YuOqU75h
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) January 28, 2022
सनातन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
१. पंजाबमधील युवा पिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा चित्रपटही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’ आणि ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. इथे मात्र वाईन सहजासहजी उपलब्ध करून आपण मद्य पिण्यास प्रोत्साहनच देत आहात.
२. आधीच राज्यातील महिला आणि बालके मद्यपी पती अन् वडील यांच्या अत्याचारांनी पीडित आहेत. या निर्णयामुळे हे अत्याचार वाढीस लागून त्याचे पाप सरकारच्याच माथी लागेल.
३. ‘अथर्ववेद’, ‘महाभारत’, ‘मनुस्मृति’ आदी अनेक धर्मग्रंथांत मद्यपान हे महापाप सांगितले आहे. त्याला प्रोत्साहन हेही महापापच ठरेल. त्यामुळे सरकारने हा समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्यावा.
गोमाता रक्षणासाठी २७ जुलैला देशव्यापी ‘गो सन्मान’ अभियान !
काँग्रेसची विधान परिषद मतफुटीप्रकरणाची चौकशी कागदावरच !
मूल्यांकन करून राज्यातील शासकीय रुग्णालयांचे होणार नामांकन !
पाणंद आणि शेत मार्ग यांच्या दुतर्फा केलेल्या वृक्षरोपणाच्या संगोपनाचे दायित्व ग्रामपंचायतींचे !
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर