संस्कारांच्या अभावामुळे कामांध पिढी निपजणे हे मेकॉले शिक्षणपद्धतीचे अपयश होय ! – संपादक
मुंबई – गोवंडी येथे तरुणीवर बलात्कार करणार्या २ अल्पवयीन मुलांसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दिली आहे. ही घटना २१ जानेवारीच्या पहाटे घडली. ही तरुणी पहाटे कामावरून घरी येत असतांना वरील चौघांनी तिला रस्त्यात अडवून एका झोपडीत नेले आणि तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली.