मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ६० किमी वेगमर्यादा लागू !

गेल्या २ दिवसांपासून नवीन वेगमर्यादेची कार्यवाही चालू झाली आहे.

४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, उलट्या यांचा त्रास !

मुंबई विद्यापिठाच्या कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतिगृहातील ४० हून अधिक विद्यार्थिनींना जुलाब, पोटदुखी, डोकेदुखी, उलट्या, अशक्तपणा असे त्रास होत आहेत.

महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांतील नागरिकांना मतदार नावनोंदणीची संधी !

यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या मतदारसंघांचा समावेश आहे.

पीएच्.डी. करणार्‍या पुरोगामी विद्यार्थ्याचे २ वर्षांसाठी निलंबन !

‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !

कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई ‘वॉन्टेड (हवा असलेला) आरोपी’ घोषित !

अभिनेते सलमान खान यांच्या घरावर अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना कह्यात घेतले आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

सलमान खान यांच्या घरी लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने ‘कॅब’ पाठवणारा अटकेत !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याने कुणी कोणतेही कृत्य करायला धजावतो, हेच खरे !

उष्माघातामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे दिवसाला १०० प्राणी-पक्षी घायाळ !

उष्माघातामुळे दिवसाला सरासरी १५ ते २० प्राणी-पक्षी यांचा मृत्यू होत आहे. यात वटवाघुळ, खार, माकड, वानर, पोपट, कोकिळा, घार, मैना, घुबड, चिमणी आणि कावळा यांचा समावेश आहे.

मुंबईत ५० झाडांवर विषप्रयोग केल्याचे उघड; गुन्हा नोंद

पेल्टोफोरम, सुबाभूळ आणि पिंपळ या झाडांना छिद्रे पाडून त्यात विष ओतण्यात आले. प्रत्येक झाडावर ५ ते ६ छिद्रे आढळली. 

Gaza-Loving Communist Mentality : सनातनचे धार्मिक विधींविषयीचे अ‍ॅप बंद करण्यामागेही ‘गाझाप्रेमी’ साम्यवादी मानसिकता; दोषींवर गूगलने कारवाई करावी ! – सनातन संस्था

वरकरणी गाझामधील हिंसाचार रोखला जावा अथवा इस्रायलसमवेतच्या करारामुळे गाझामध्ये हिंसाचाराला हातभार लागू नये; म्हणून सदर कर्मचारी आंदोलन करत असल्याचे दिसत असले, तरी हीच संवेदनशीलता पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराच्या वेळी कुठल्या बिळात जाऊन लपते ?