मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाच्या दूरभाष क्रमांकावर उर्दू भाषेतून धमकीचा संदेश आला. परदेशातील क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला. ‘सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश’, असा त्यात उल्लेख असून या संपूर्ण कृत्याला उत्तरप्रदेश सरकार उत्तरदायी असल्याचे संदेशात म्हटले आहे. संदेशात २६ नोव्हेंबर २००९ या दिवशी मुंबईवर करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. याविषयी गुन्हे शाखेला कळवण्यात आले आहे. प्राथमिक पहाणीत संदेश पाठवणार्याने खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे; परंतु असे असले, तरी या संदेशामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
#NewsKiPathshala: ‘सीमा हैदर को पाकिस्तान भेजो नहीं तो 26/11 जैसे हमले के लिए तैयार रहो’..मुंबई पुलिस को मिली धमकी का देखिए, चैप्टर @SushantBSinha की ‘न्यूज़ की पाठशाला’ में देखिए, क्या सीमा ISI जासूस है?
#SeemaHaider #Pakistan #UPPolice pic.twitter.com/y2sIxL1v5R— Times Now Navbharat (@TNNavbharat) July 13, 2023
नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून धमकीचा संदेश आला होता. त्या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.