मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती’वर ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांची निवड झाली आहे. राज्यातील ७ प्रतिष्ठित माध्यमांतील प्रतिनिधींचा या समितीमध्ये ‘अशासकीय सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये श्री. स्वप्नील सावरकर यांचा समावेश आहे.
दैनिक ‘नवराष्ट्र’चे संपादक नरेंद्र कोठेकर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधी मनीषा रेगे, दैनिक ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय बाविस्कर, दैनिक ‘तरुण भारत’चे संपादक गजानन निमदेव, दैनिक ‘जनादेश’चे संपादक कैलास म्हापदी यांनाही अशासकीय सदस्य म्हणून या समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात किंवा आकस्मिक निधन यांसाठी आर्थिक साहाय्य देण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीद्वारे जमा होणार्या निधीच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या विश्वस्त संस्थेच्या कार्यकारी मंडळावर श्री. स्वप्नील सावरकर यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.