लोकसभा आणि विधानसभा यांच्या एकत्रित निवडणुकांच्या दृष्टीने आमची सिद्धता चालू ! – श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

श्रीकांत देशपांडे

मुंबई, १४ जुलै (वार्ता.) – लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका एकाच वेळी आल्यास त्यादृष्टीने आमची सिद्धता चालू आहे. या दोन्ही निवडणुका एकत्रित झाल्यास काही प्रमाणात अधिक ‘ईव्हीएम्’ यंत्रे लागतील. एका ईव्हीएम् यंत्रात १५ राजकीय पक्षांची नोंद ठेवता येते. त्याहून अधिक पक्ष असल्यास दुसरे मतदान यंत्रे वापरावे लागले. महाराष्ट्रात दीड लाखांहून अधिक ईव्हीएम् यंत्रे आहेत. येत्या मासात ईव्हीएम् यंत्रांची पडताळणी पूर्ण होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.