मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांत ६१ टक्के पदे रिक्त !

मुंबई विद्यापिठाच्या विविध विभागांतील १३६ शिक्षकांची पदे भरण्यास शासनाकडून संमती मिळाली आहे. पदभरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

कल्याण येथील आधारवाडी कारागृहात बंदीवानाकडे सापडले १५ भ्रमणभाष !

इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाष कारागृहात येतातच कसे ? बंदीवानांना पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही !

Exclusive: ‘भ्रष्टाचारी’ म्हणून पकडलेले ९४ टक्के आरोपी सुटतात, तर ८५ टक्क्यांहून अधिक पुन्हा शासकीय सेवेत रूजू होतात !

लोकहो, भ्रष्टाचार का थांबत नाही ? हे लक्षात घ्या ! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाड पडल्यास ‘एका भ्रष्टाचार्‍याला शिक्षा झाली’, असा राष्ट्रप्रेमी नागरिकांचा समज होत असेल, तर या वृत्तावरून हा अपसमज दूर होईल !

शिवरायांनी नष्‍ट केलेल्‍या वतनदार्‍या शरद पवार यांनी पुन्‍हा चालू केल्‍या ! – सदाभाऊ खोत, अध्‍यक्ष, रयत शिक्षण संस्‍था

वर्ष १९७८ मध्‍ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि त्‍यानंतर महाराष्‍ट्राच्‍या राजकारणाला जातीपाती अन् घराणेशाही यांचे वळण मिळाले.

सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ! – नरहरि झिरवळ, उपाध्‍यक्ष, विधानसभा

सर्व बाजूने विचार केला, तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत; पण हा निर्णय शेवटी अध्‍यक्षांकडे असेल. त्‍यांच्‍याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्‍यामुळे मी त्‍याच्‍यावर वक्‍तव्‍य करणे उचित ठरणार नाही, असे महत्त्वाचे विधान त्यांनी केले.

खातेवाटप लवकरच स्‍पष्‍ट होणार !- उदय सामंत, मंत्री

१७ जुलै या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी म्‍हटले आहे, तसेच पूर्वी २-३ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्‍तार होऊ शकतो, असे भरत गोगावले यांनी म्‍हटले होते.

मुंबईतील २ पर्यटकांचा लोणावळ्‍यात बुडून मृत्‍यू, एकाला वाचवण्‍यात यश !

सध्‍या पावसाळा चालू असल्‍याने लोणावळा आणि परिसरात वर्षाविहाराचा आनंद घेण्‍यासाठी ठिकठिकाणी पर्यटक येत आहेत. येथील वरसोली गावामध्‍ये वर्षाविहारासाठी मुंबईतील ३ पर्यटक आले होते.

उल्‍हासनगर येथील भाजपाचे नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार

भाजपचे पदाधिकारी नरेश रोहरा यांच्‍या कार्यालयाजवळ गोळीबार करण्‍यात आला. त्‍यांच्‍या अंगरक्षकांनीही गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये चित्रीत झाली आहे.

मुंबईत युवतीवर बलात्कार करणार्‍या रिक्शाचालकाला अटक !

महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेऊन स्वत:च्या रक्षणासाठी युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षण घ्यावे !

महापुरुषांनी शिक्षण घेतलेल्‍या शाळांमध्‍ये महाराष्‍ट्र शासन त्‍यांच्‍या कार्याचे संग्रहालय उभारणार !

राज्‍यातील अशा १३ ऐतिहासिक गावांतील शाळांची शासनाने निवड केली आहे. या शाळांमध्‍ये संबंधित राष्‍ट्रपुरुषांच्‍या कार्याची माहिती सांगणारी संग्रहालये उभारण्‍यात येणार आहेत. यासाठी १४ कोटी ३० लाख रुपयांचा निधी शासनाने घोषित केला आहे.