हिंदूंच्या संघटितपणामुळे वादग्रस्त ‘पोस्ट’ प्रकरणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे धर्मांधांवर पोलिसांची कारवाई !

२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.

मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन चर्चा करावी ! – जरांगे

मनोज जरांगे यांची २५ जानेवारीला पुन्हा एकदा भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोचले होते. आंदोलकांशी चर्चा करून त्यानंतरच सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करू, असे जरांगे यांनी त्या वेळी सांगितले; परंतु अखेरीस ही चर्चा निष्फळ ठरली.

जालना येथून मुंबईच्या दिशेने आंदोलनकर्ते मनोज जरांगे रवाना !

मनोज जरांगे म्हणाले की, आता छातीवर गोळ्या लागल्या, तरी माघार नाही. समाजासाठी मी बलीदान देण्यास सिद्ध आहे. त्या संदर्भात समाजाला विचारून निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे

आव्हाड यांना २४ घंट्यांत अटक न केल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा नेण्याची चेतावणी !

प्रभु श्रीरामावर अश्लाघ्य टीका करणारे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आनंद परांजपे यांच्याकडून कानउघाडणी !

नरसंहाराच्या विरोधात सहस्रो बलुची नागरिक रस्त्यावर !

‘भारताला हिंस्र ठरवणार्‍या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना पाकचा हा नरसंहार हिंस्र वाटत नाही का ?’ अशी विचारणा भारताने या संघटनांना करणे आवश्यक !

ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाचा मोर्चा !

ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी सकाळी ऐरोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात ३०० हून अधिक हिंदू सहभागी झाले होते.

सरकारला जागे करण्‍यासाठी किसान सभेद्वारे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

बीड जिल्‍ह्यातील शेतकर्‍यांना दुष्‍काळी अनुदान मिळत नाही, तसेच पीक विम्‍याचेही पैसे जमा होत नसल्‍याने किसान सभेने आंदोलनाची चेतावणी दिली होती. त्‍यानुसार जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्‍यात आले.

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या कार्यकर्त्यांसह दीड सहस्र जणांवर गुन्हे नोंद !

बेळगाव पोलिसांनी अनुमती नाकारलेली असतांनाही १ नोव्हेंबरला निषेधफेरी काढणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याविषयी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे १८ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दीड सहस्र मराठी भाषिक यांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

पुणे येथील नवले उड्डाणपुलाजवळ आंदोलन करणार्‍या ५०० आंदोलकांवर गुन्‍हा नोंद !

३१ ऑक्‍टोबर या दिवशी दुपारी १२ वाजता नवले उड्डाणपुलाजवळ कार्यकर्ते गोळा झाले. त्‍यांनी रस्‍त्‍यावर टायर पेटवल्‍याने दोन्‍ही बाजूंची वाहतूक ठप्‍प झाली होती.

मंचर (पुणे) येथे इस्रायलकडून हमासवर होणार्‍या हवाई आक्रमणाच्‍या विरोधात मुसलमानांचा मोर्चा !

इस्रायलकडून गाझापट्टीत ‘हमास’ या आतंकवादी संघटनेवर हवाई आक्रमणे होत आहेत. या घटनेच्‍या निषेधार्थ मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मुसलमानांनी मोर्चा काढून याचा निषेध व्‍यक्‍त केला. मोर्चानंतर इस्रायलच्‍या विरोधात निषेध सभेत मुसलमानांनी रोष व्‍यक्‍त केला.