वाशिम येथे ८ वर्षीय मुलीवर अत्याचार !

वाशिम – येथे एका कुटुंबातील सदस्य हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्याच वेळी गुंड प्रवृत्तीचा विजय उपाख्य भोला बरखम याने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या वेळी त्याने तिला जिवे मारण्याची धमकीही दिली. यातील ‘सहआरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी’, अशी मागणी वज्रदेही महिला विकास संघाच्या अध्यक्षा आरती ठोके यांनी कार्यकर्त्या महिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केली. या मोर्च्याला पुष्कळ महिला उपस्थित होत्या. (आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढावा लागणे दुर्दैवी ! पोलीस तात्काळ अटक का करत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी !’