उरण आणि धारावी हत्याकांडांतील आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी !

जळगाव – उरण येथील यशश्री शिंदे आणि धारावी येथील धीरज वैश्य यांच्या हत्याकांडांतील आरोपींना कडक शिक्षा द्या, या मागणीसाठी अमळनेर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेसह समस्त हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना या वेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,
१. अनेक तरुण-तरुणींची क्रूरपणे हत्या केली जात आहे. उरण आणि धारावी येथील घटनांमध्ये लव्ह जिहाद आणि हिंदूविरोधी मानसिकतेचा हात आहे.
२. या दोन्ही घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
३. हिंदु समाजात दहशत निर्माण करणार्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावी.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव : हिंदु युवकाची आत्महत्या !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !