सोलापूर – येथील शासकीय रुग्णालयात शस्त्रकर्म करणार्या आधुनिक वैद्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम दिले आहे. त्यामुळे शस्त्रकर्म करणार्या तज्ञांची कमतरता भासत आहे. कोरोना वाढत असतांना शस्त्रकर्म केल्यास त्या रुग्णालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नियमित शस्त्रकर्मे तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
१. नियमित शस्त्रकर्मे थांबवण्यात आली असली तरी कोरोना संसर्गाच्या काळात प्रसूती, अपघात तसेच अन्य प्रकारच्या अपघातांच्या तातडीची शस्त्रकर्मे चालू ठेवण्यात आली आहेत.
२. येथील शासकीय रुग्णालयात केवळ कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार केले जातात. येथे केवळ कोरोनाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ए ब्लॉकची क्षमता १६५ पर्यंत वाढवण्यात आली असून तो ब्लॉकही पूर्णपणे भरलेला आहे, तसेच बी ब्लॉकमधील कोविड वॉर्डही रुग्णांनी भरलेला आहे.