
बीड – येथील जिल्हा रुग्णालयात २४ एप्रिलच्या पहाटे ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणाचा खुलासा करतांना अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड म्हणाले की, अज्ञात व्यक्तीकडून ऑक्सिजन पुरवठा करणारा मुख्य कॉक बंद झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना होऊ शकला नाही. (ऑक्सिजन पुरवठा करणार्या मुख्य कॉकपर्यंत अज्ञात व्यक्ती जाते कशी ? यासाठी काही सुरक्षा कशी नाही ? या समस्येकडे संवेदनशीलतेने पाहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे. – संपादक) नुकतेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अर्धा घंटा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !