पुणे येथे अटक केलेल्या दलालांनी आणखी दोघांना मूत्रपिंड दिल्याचे उघड !

मूत्रपिंडाच्या व्यापाराचे हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

‘आय.एम्.ए.’ने रुग्णांची लूट थांबवावी !

खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता.

चंद्रपूर येथील सी.एच्.एल्. रुग्णालयावरील निलंबनाची कारवाई महापालिकेडून मागे !

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांची अनुमती रहित करत नियमित सराव चालू करण्याच्या सूचना दिल्या होत्या

‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये अपप्रकार आणि सरकारचा हस्तक्षेप !

‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे.

राज्यात कोरोनामुळे दगावलेल्या २१० पैकी केवळ २७ आधुनिक वैद्यांना साहाय्य !

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नोंदींनुसार ९९ खासगी आधुनिक वैद्यांचा मृत्यू !

राजस्थानमध्ये अनुसूचित जातींतील लोकांसाठी विनामूल्य आयुवेर्दिक चकित्सा शिबिराचे आयोजन !

अशी शिबिरे सर्वांसाठीच उपयुक्त असल्याने ती सर्वांसाठीच का आयोजित केली जात नाहीत ?

बुलढाणा येथे २ बनावट आधुनिक वैद्य कह्यात !

सर्व यंत्रणा हाताशी असतांना केवळ २ बनावट आधुनिक वैद्यांवर वरवरची कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बनावट आधुनिक वैद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत !

मदुराई वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महर्षि चरक यांच्या नावाने शपथ घेतल्याने अधिष्ठाता निलंबित !

तमिळनाडूतील  द्रमुक सरकारचा हिंदुद्वेष ! सध्या हिप्पोक्रेटसच्या नावाने विद्यार्थी शपथ घेतात, तो पाश्चात्त्य वैद्य आहे; मात्र महर्षि चरक हे भारतीय आहे; मात्र जे जे हिंदूंचे आहे, ते नाकारण्याची द्रमुक सरकारची रित आहे. तीच या कृतीतून पुन्हा एकदा प्रकट झाली !

‘असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘कॅपिकॉन’ या दोन दिवसांच्या वैद्यकीय परिषदेचे आयोजन !

या परिषदेसाठी ३०० हून अधिक चिकित्सक उपस्थित रहाणार आहेत.

भारतात ‘कोरोना’चा संसर्ग झाल्यानंतर सरकारी यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळे साधकाला आलेले कटू अनुभव

शासनाने कार्याच्या दृष्टीने वेगवेगळे विभाग (खाती) करून त्या विभागावर त्या त्या कार्याचे दायित्व सोपवलेले असते; पण गोंधळ असा होतो की, या सर्व सरकारी खात्यांमध्ये कुठलाही समन्वय होत नाही.