गोव्यात वर्ष २०२४-२५ पासून ‘जीसीईटी’ परीक्षा नाही : प्रवेशासाठी ‘जेईई मेन’ परीक्षा अनिवार्य

पणजी, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील अभियांत्रिकी आणि ‘फार्मसी’ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली ‘जीसीईटी’ परीक्षा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई मेन’ परीक्षेत मिळणार्‍या गुणांच्या आधारावर या अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. तंत्रशिक्षक संचालनालयाने यासंबंधी सूचना प्रसिद्ध केली आहे.

गोव्यात फार्मागुडी येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अन्य ४ मिळून एकूण ५ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत आणि यांमध्ये एकूण सुमारे १ सहस्र ५०० जागा आहेत. तसेच ‘फार्मसी’ अभ्यासक्रमासाठी ‘पी.ई.एस्.’, फोंडा महाविद्यालय आणि पणजी येथील सरकारी ‘फार्मसी’ महाविद्यालय आहे अन् या ठिकाणी एकूण १२० जागा आहेत.