बीड जिल्ह्यात पुन्हा अवैध गर्भपात; पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद !

पहिली मुलगी असल्याने दुसरी मुलगी नको म्हणून सासरच्या लोकांकडून महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. पती, सासू यांसह चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांच्या समाप्ती तिथीविषयी (एक्सपायरी डेटविषयी) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने केलेला अभ्यास

अमेरिकेच्या सैन्याकडे आपत्कालीन साहाय्यासाठी मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा केलेला असतो. सैन्याला यातील कोट्यवधी डॉलर्सची औषधे केवळ समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) झाली; म्हणून फेकून देऊन नवीन विकत घ्यावी लागत.

भारताने ३ सहस्र वर्षांपूर्वी शस्त्रकर्म आरंभले !

‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान केंद्र’ करू इच्छिते संशोधन !

उपचार विनामूल्य असूनही ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील लाभार्थ्यांकडून काही रुग्णालयांनी १५ कोटी रुपये उकळले !

लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, याची माहिती मिळत नाही. पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर परवाना रहित करण्यासमवेत फौजदारी कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत !

अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधांच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचा ठाणे येथे मोर्चा !

आरोग्य सेवा देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आधुनिक वैद्यांच्या जागी मांत्रिकांची नियुक्ती करावी, अशी उपरोधिक मागणी करत श्रमजीवी संघटनेने येथील साकेत मैदान ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने मोर्चा काढला.

राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन !

परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहात अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांना निलंबित करणार ! – विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी अमलीपदार्थ सापडल्याच्या प्रकरणी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

अंडाशयावरील गाठ ! घाबरुन न जाता समजून घ्या !

गाठ म्हटल्यावर ‘कर्करोग’ हा एकच विचार रुग्णांच्या मनात येतो आणि उगाचच घाबरगुंडी उडते. पाळी चालू झाल्यापासून ते थांबेपर्यंत कोणत्याही वयात अशा साध्या गाठी अंडाशयावर येऊ शकतात. तसेच त्या कर्करोगाच्या असण्याची शक्यता फारच अल्प असते. या गाठी ‘हॉर्मोन्स’च्या (संप्रेरकाच्या) असंतुलनामुळे होतात.