९१ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा शासनाधिन !

लाखो रुपयांचा मद्यसाठी सापडणे, हे सुरक्षायंत्रणेचे अपयश नव्हे का ?

पिंपरी (पुणे) येथे ६० लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त !

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर तळेगाव टोलनाका परिसरात उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विदेशी मद्याचा मोठा साठा पकडला. हे मद्य गोवा राज्यात विक्रीसाठी नेले जात होते.

अवैध वाळू उपसाप्रकरणी कारवाईसाठी आमदारांचे गोदावरी नदीपात्रात ‘जलसमाधी आंदोलन’ !

कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?

ससून रुग्णालयातून दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या चौकशीचे आदेश !

समाजातील नीतीमत्ता ढासळत चालल्याचे हे अजून एक उदाहरण ! अनेक वर्षांपासून बनावट प्रमाणपत्रे दिली जात असूनही ससून रुग्णालयावर कारवाई का केली नाही ? बनावट प्रमाणपत्रांमुळे अयोग्य व्यक्तींनी लाभ घेतल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हायला हवी !

पाळीव कुत्र्याला फिरण्यासाठी खेळाडूंना मैदान सोडण्यास लावणार्‍या ‘आय.ए.एस्.’ दांपत्याचे स्थानांतर !

प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये ‘ते जनतेचे सेवक नसून मालक आहेत’, अशी उद्दाम मानसिकता रूढ होत असल्याचेच हे उदाहरण !

कोकण विभागातील ११ सरपंच आणि १ उपसरपंच यांना अधिकारपदावरून काढले !

सरपंच आणि उपसरपंच यांनी गैरवर्तन, तसेच गैरव्यवहार केल्याचे प्रकरण, सरपंचांकडूनच असे प्रकार होत असतील, तर ते गाव आणि ग्रामस्थ यांचे दायित्व कसे पार पाडणार ?

सरकारी यंत्रणेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून प्रतिवर्षी जनतेच्या कोट्यवधी रुपयांची लूट !

१२ वर्षांत १२ सहस्र ५९० (प्रत्येक दिवशी ३) लाचखोरीची प्रकरणे उघड !

भंडारा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांवर आक्रमण करणाऱ्या आरोपीसमवेत जेवणारे ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

वाळू माफियासमवेत जेवतांना पोलिसांना काहीच कसे वाटत नाही ? गुन्हेगारांसमवेत पोलिसांचेच ‘जिव्हाळ्या’चे संबंध असतील, तर असे पोलीस वाळू माफियांवर कठोर कारवाई करतील का ? सरकारने अशा पोलिसांना निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !

संभाजीनगर येथे खेळण्यांच्या नावाखाली कुरिअरद्वारे मागवलेल्या ३६ तलवारी पोलिसांकडून जप्त !

या घटनांमागील गुन्हेगार शोधून त्यांना कठोर शिक्षा न करणे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास शाळेची मान्यता रहित करणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.