कुणाल कामराच्या सूत्रावरून विधान परिषेदत गदारोळ !

मुंबई, २४ मार्च (वार्ता.) : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ संबोधल्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. या सूत्रावरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी गदारोळ घातल्यानंतर सभापतींनी विधान परिषदेचे कामकाज १५ मिनिटांसाठी स्थगित केले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन येथे माध्यमांशी संवाद pic.twitter.com/R8dw4KPcRO
— Uday Samant (@samant_uday) March 24, 2025
कुणालचा बोलविता धनी शोधायला हवा. ज्या पद्धतीने बोलले गेले, ती विकृती आहे. ती विकृती आपण ठेचली पाहिजे, असे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केले.