मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत मतदानाविषयी आहे उदासीनता !

मुंबईत ६ लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये ३६ विधानसभा मतदारसंघ येतात. वर्ष २०१४ आणि २०१९ या लोकसभेच्या २ पंचवार्षिक निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी चिंताजनक आहे.

बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !

सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह आहे, तर अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह दिले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या.

WB Violance : जेथे हिंसाचार झाला, तिथे निवडणुका घेऊ नयेत ! – कोलकाता उच्च न्यायालय

हे बंगालमधील तृणमूल काँग्रेसला लज्जास्पद ! लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असणारी निवडणूकच घेण्यासारखी स्थिती नाही, असे उच्च न्यायालयाला वाटते, यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते.

PM Modi Goa Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ एप्रिलला गोव्यात !

वर्ष २०१९ मध्ये भाजपला दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ गमवावा लागला होता. या मतदारसंघावर भाजपने आता अधिक लक्ष केंद्रित केले आहे आणि यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे दक्षिण गोव्यात आयोजन करण्यात आले आहे.

‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत

भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

BJP Candidate Surat:सूरत येथून भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

BharatRatna To Yashvantrao Chavan : सत्तेत आल्यास यशवंतराव चव्हाण यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याचा प्रयत्न करू ! – राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून २२ एप्रिल या दिवशी निवडणूक घोषणापत्र घोषित करण्यात आले !

Boycott Lok Sabha Elections 2024 : कुणकेरी (सिंधुदुर्ग) येथील सरुंदेवाडीत सर्वपक्षियांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बंदी !

हे जनतेच्या विकासाच्या वल्गना करणारे राजकीय पक्ष आणि प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद ! सर्वत्रच्या जनतेने अशा प्रकारचा निर्णय घेतल्यास राजकीय पक्ष आणि प्रशासन काय करतील ?

प्रचारगीतामधून ‘जय भवानी’ उल्लेख हटवणार नाही ! – उद्धव ठाकरे  

‘जय भवानी, जय शिवाजी’ ही आमची घोषणा आहे. घोषणेतील ‘जय भवानी’ शब्द काढल्यावर भविष्यात ‘जय शिवाजी’ उल्लेख काढायला लावाल. अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही.

PM MODI : ख्रिस्ती समाजाच्या सहकार्यानेच गोव्यात भाजपचे सरकार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.