‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? – संजय राऊत

संजय राऊत

मुंबई – ‘घर घर मोदी’ चालते मग आमचे ‘हर हर महादेव’ आणि ‘जय भवानी’ का चालत नाही ? निवडणूक आयोग ही भाजपची शाखा झालेली आहे. भारत निर्वाचन आयोगाचे नाव बदलून भाजप निर्वाचन आयोग करावे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.

ते पुढे म्हणाले की, आचारसंहितेमध्ये कुणी मंत्री नसते, कुणी पंतप्रधान नसते, नरेंद्र मोदी हे आता देशाचे काळजीवाहू पंतप्रधान आहेत. त्यांच्या भाषणात दहा वर्र्षांत केलेली कामे सोडून त्यांचा प्रचार नको त्या सूत्रांवर भरकटलेला आहे. यांचे हिंदुत्व बकवास आहे.

एकनाथ शिंदे कारागृहात जायला घाबरले म्हणून भाजपच्या संगतीला गेले, ते आज काहीही उलट सुलट आरोप करत आहेत. तुरुंगात जायचे नाही म्हणून ते कुणाकुणापाशी रडले ?, हे त्यांनी सांगितले होते. आज जेलवारी टळली असेल; पण उद्या टळणार नाही, असेही राऊत या वेळी म्हणाले.