सुप्रिया सुळे यांचा आक्षेप, निवडणूक आयोगाला पत्र
पुणे – बारामती लोकसभेच्या अपक्ष उमेदवार सोहेल शेख याला ‘ट्रम्पेट’ म्हणजे ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून निवडणूक लढवणार्या सौ. सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याविषयीचे पत्र त्यांनी ‘ईमेल’द्वारे निवडणूक आयोगाला पाठवले आहे.
सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह आहे, तर अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह दिले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या. हा गोंधळ टाळण्यासाठी मराठी नावातील ‘तुतारी’ हा शब्द पालटून त्याऐवजी दुसरा शब्द द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.