BJP Candidate Surat:सूरत येथून भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

सूरत (गुजरात) – लोकसभेची निवडणूक ७ टप्प्यांत होत आहे आणि याचा निकाल ४ जून या दिवशी लागणार आहे; मात्र सूरत मतदारसंघाचा निकाल आताच लागला आहे. येथे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शेष राहिले, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली.