श्रीनगरमध्ये ३ आतंकवादी ठार

आतंकवाद्यांचे समर्थक असणार्‍या धर्मांधांकडून सुरक्षादलांवर दगडफेक

अशा धर्मांधांना आतंकवाद्यांचे समर्थक समजून त्यांच्यावरही गोळीबार करण्याचा अधिकार सरकारने सुरक्षादलांना दिला पाहिजे ! जगात असा प्रकार कुठल्याही देशात होत नाही आणि झाला, तर तो खपवूनही घेतला जात नाही; मात्र भारत अशांच्या संदर्भात बोटचेपे धोरण राबवल्यामुळे अशांचे फावते आहे !

श्रीनगर – येथील लावापोरा भागात आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. हे आतंकवादी येथील एका इमारतीमध्ये लपून बसले होते.

जवळपास १५ घंटे ही चकमक चालू होती. या वेळी धर्मांधांकडून सुरक्षादलांवर दगडफेकही करण्यात आली. त्या वेळी पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या.