कोरोनाच्या उत्पत्तीसाठी वुहानमधील नव्हे, तुमच्या प्रयोगशाळेची चौकशी करा ! – चीनचे अमेरिकेला आव्हान

चीनने अमेरिकेला आव्हान देत बसण्यापेक्षा जागतिक मत त्याच्या विरोधात आहे, हे लक्षात घ्यावे. तसेच कोरोनाच्या निर्मितीविषयी जे सत्य आहे, ते जगाला सांगायला हवे !

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत.

अमेरिकेत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मास्क लावण्याची आवश्यकता नाही !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वंशसंहार : आर्मेनियन्सचा आणि हिंदूंचा !

ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.

आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाला अमेरिकेची मान्यता !

पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.

भारतातील परिस्थिती अत्यंत विदारक आणि हृदयद्रावक ! – जागतिक आरोग्य संघटना

डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेचा दुटप्पीपणा !

इतरांच्या साहाय्याला धावून जाण्याची हिंदूंची प्राचीन परंपराच आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असणार्‍या देशाची मूल्ये किती पोकळ आणि स्वार्थी आहेत, हेच दिसून येते.

अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्व प्रौढ व्यक्तींचे कोरोना लसीकरण

अमेरिकेत १९ एप्रिलपासून सर्व प्रौढ व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ही घोषणा केली. अमेरिकेत आतापर्यंत १५ कोटी जणांना लस देण्यात आली आहे.

पुतीन हत्यारे असल्याने त्यांना मूल्य चुकवावेच लागेल ! – जो बायडेन

नोव्हेंबर २०२० च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केलेल्या हस्तक्षेपाची किंमत त्यांना मोजावी लागेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे.

भारतीय वंशांच्या लोकांनी अमेरिकेमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनामध्ये आतापर्यंत भारतीय वंशाच्या ५५ जणांची नेमणूक करण्यात आली आहे.